हिस्ट्री टीव्ही18 ची नवी डॉक्युसिरीज ‘ इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज विथ विल्यम डॅलरिंपल’
December 29, 2023
0
*पुरातन आश्चर्ये, विस्मृतीत गेलेल्या घटना आणि उत्तरे न सापडलेल्या प्रश्नांचा मागोवा घेणारी हिस्ट्री टीव्ही18 ची नवी डॉक्युसिरीज ‘ इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज विथ विल्यम डॅलरिंपल’*
4 जानेवारी 2024 पासून दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता ही सिरीज आपल्याला हिस्ट्री टीव्ही18 वर पाहाता येईल.
हिस्ट्री टीव्ही 18 च्या ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ या पुरस्कार विजेत्या डॉक्युसिरीजचा पुढचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. जगप्रसिद्ध लेखक विल्सम डॅलरिंपल हे या डॉक्युसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली तथ्ये, रहस्ये, कहाण्या पुन्हा उजेडात आणण्याचा, मानवी मनाला पडलेल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या डॉक्युसिरीजद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे. ही उत्तरे शोधण्यासाठी भारतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागा, पुरातन वास्तू यांना भेटी देण्यात आल्या असून काळाच्या उदरात गाडली गेलेली उत्तरे शोधून बाहेर काढली जाणार आहेत. या प्रयत्नातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येणार आहेत. हजारो लाखों वर्षांपूर्वीची मानवी संस्कृती, भारतातील साम्राज्ये, त्याकाळी आपल्या पूर्वजांनी कोणतीही प्रगत साधने नसतानाही निर्माण केलेल्या वास्तू हे सगळं या डॉक्युसिरीजमधून आपल्याला पाहाता येईल. डॉक्युसिरीजचा प्रत्येक भाग हा अर्धा तासांचा असून यामध्ये भारताच्या विविध भागांचा इतिहास त्याच्याशी निगडीत रहस्ये, गूढ, अगम्य बाबी अशा असंख्य गोष्टींचा उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ विथ विल्यम डॅलरिंपलची सुरुवात 4 जानेवारी 2024 पासून होणार आहे. ही डॉक्युसिरीज एक्स्लुझिव्हली हिस्ट्री टीव्ही 18 वर पाहता येणार आहे. दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता या मालिकेतील नवा भाग आपल्याला पाहायला मिळेल.
या मालिकेचा उद्देश हा भारताच्या संपन्न आणि वैभवशाली इतिहासाचा मागोवा घेणे हा आहे. ही मालिका सात भागांची असून ही मालिका दर्शकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरणारी आहे. या मालिकेमध्ये इतिहास डोळ्यासमोर जिवंत उभा राहावा यासाठी नाट्यरुपांतरणे करण्यात आली असून यामुळे त्या काळातील वेशभूषा, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती कशी असावी याचा अंदाज बांधता येऊ शकेल. भारतामध्ये काही निर्माण कामे अशी करण्यात आली आहे, जी पाहताना आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान हाताशी नसतानाही ती कशी उभी करण्यात आली असतील असा प्रश्न पडतो. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या काळात, साम्राज्यांमध्ये, महत्त्वाचे ठिकाणे असलेल्या मात्र आता फारशा परिचित नसलेल्या भागांना भेटी देऊन तिथलाही इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देखणे ग्राफिक्स, जुने फोटो, डोळ्याचे पारणे फेडणारी दृश्ये आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण यामुळे ही मालिका अतिशय सुंदर बनली आहे. इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव सुवर्णाक्षरात कोरणाऱ्या व्यक्ती कशा होत्या, त्यांनी केलेले काम काय होते हे या मालिकेद्वारे दाखवण्यात आले आहे. उत्कृष्ट निवेदन, इतिहासकारांनी मांडलेली तथ्ये आणि महत्त्वाचे म्हणजे विल्यम डॅलरिंपल यांचे सादरीकरण यामुळे ही मालिका प्रेक्षणीय झाली आहे. भारतासह जगभरातील नव्या पिढीला भारताचा इतिहास किती समृद्ध आणि वैभवशाली होता याची झलक दाखवण्याचा या मालिकेचा उद्देश आहे. भारतामध्ये आजही अशी वास्तूशिल्पे आहेत जी जगात इतर कुठेही पाहायला मिळत नाही. या वास्तूंची आणि शिल्पांची वैशिष्ट्यता काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे हे या मालिकेतून समजण्यास मदत होईल.
विल्यम डॅलरीम्पल यांनी या मालिकेच्या निमित्ताने बोलताना म्हटले की, "इतिहास हा एका रस्त्याप्रमाणे आहे ज्यामुळे आपण वर्तमानात कुठे उभे आहोत आणि आपण इथपर्यंत कसे पोहोचलो हे समजू शकते. जर हा मार्ग आपल्याला सापडला नाही तर आपण हरवून जाऊ. हिस्ट्रीटीव्ही 18 सोबत या मालिकेसाठी काम करणं हे माझ्यासाठी आनंददायी होतं. ही मालिका अत्यंत सुंदरपणे चित्रीत करण्यात आली आहे. इतिहास नव्याने शोधताना सापडलेल्या गोष्टी, तथ्ये जेव्हा प्रेक्षक पाहतील तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल, आणि हीच आमच्या कामाची पोचपावती असेल. "
देशभरात प्रवास करून तयार करण्यात आलेल्या या मालिकेमध्ये, भारतातील प्रसिद्ध आणि भव्य वास्तुशिल्पांची, ऐतिहासिक ठिकाणांची स्थानांची नव्याने ओळख होते. ही ठिकाणे किंवा वास्तू अशा आहेत ज्यांच्याभोवतीचे गूढ उलगडण्याचा या मालिकेतून प्रयत्न करण्यात आला आहे. ऐतिहासिक घटना त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती यांचे आजच्या आधुनिक युगातील महत्त्व. वास्तू, जागा यांचे गूढ उलगडून सांगताना तज्ज्ञांनी त्यावर टाकलेला प्रकाश आणि घटना कशा घडल्या असतील याचा अंदाज येण्यासाठी करण्यात आलेले नाट्यरुपांतर यामुळे दर्शकांना ही डॉक्युसिरीज खिळवून ठेवेल.
डॉक्युजरीबद्दल बोलताना अरुण थापर, अध्यक्ष - कंटेट आणि कम्युनिकेश, AETN18 यांनी म्हटले की, "या मालिकेमध्ये विल्यम डॅलरीम्पल सहभागी झाल्याने आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे. त्यांचे विचार आणि दृष्टीकोन हे बहुमूल्य आहेत. विल्यम डॅलरीम्पल यांच्यासारख्या उच्च प्रतिभेच्या लेखकासोबतच्या सहकार्यातून हिस्ट्रीटीव्ही 18ची, खिळवून ठेवणारी कथानके सादर करण्यात आणि जागतिक दर्जाचा कंटेट निर्माण करण्याप्रती असलेली कटीबद्धता दिसून येते.
या मालिकेतून अद्भुत आणि सुंदर भारताचे दर्शन घडते. भारत हा जगातील प्राचीन आणि वैविध्यता असलेल्या देश आहे. भारताची शाश्वत वारसा संस्कृती, ज्ञान आणि कलात्मक परंपरा यांच्या संगमाने आकाराला आली आहे. या डॉक्युसिरीजमध्ये भारतातील मंदिरे,किल्ले,मध्ययुगीन शहरे, प्रागैतिहासिक वास्तू असे बरेच काही पाहायला मिळणार आहे.
उदाहरणार्थ, आतापर्यंत नोंदवून ठेवण्यात आलेल्या इतिसाहातून असे दिसून येते की, भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनावर मंदिरांनी प्रभाव टाकलेला असून मंदिरांनी इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मंदिरांची भव्यता आणि ते बनवत असताना वापरण्यात आलेले गुंतागुंतीचे तंत्रज्ञान यात या मंदिरांचे वैशिष्ट्य दडलेले आहे. या मंदिरांकडे पाहताना त्याकाळी लोकांना किती प्रगत ज्ञान होते हे कळतं. या मालिकेतून काही ज्ञात तर काही अज्ञात गोष्टी कळत जातात ज्यामुळे दर्शक आश्चर्यचकीत होतात.
रणकपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराच्या अलौकिक सौंदर्याने इथे येणारे भाविक थक्क होतात. मंदिरात एक हजारांहून अधिक स्तंभ असून ते कोरीव कामाने सजलेले आहे. १६व्या किंवा १७व्या शतकात बांधण्यात आलेल्या थिरुकुरुंगुडी, तमिळनाडूमधील मंदिरांबद्दल फारशी माहिती नाहीये. या मंदिरावरील नक्षीकाम हे थक्क करणारे आहे. डोंगरामध्ये कातळ कोरून तयार केलेले मंदिर, त्रिपुरातील खडकात कोरलेल्या देवांच्या गूढ शक्तीबाबत, हिस्ट्रीटीव्ही 18 च्या या डॉक्युसिरीजद्वारे दर्शकांना नवी माहिती मिळण्यास मदत होईल.
राणी उदयमती आणि मोगल साम्राज्ञी नूर जहान या भारतातील प्रसिद्ध महिला शासक होत्या. या मालिकेमध्ये राणी उदयमती यांनी गुजरातमध्ये बांधलेली बारव आणि नूर जहान हिने बांधलेले समाधीस्थळ दाखवण्यात आले आहे.
या डॉक्युसिरीजमध्ये मेवाड घराण्याचे पराक्रमी राजे आणि त्यांनी उभारलेले किल्ले दाखवण्यात आले आहेत. या मालिकेमध्ये मध्ययुगीन काळात दख्खन प्रांतात जुलुमी राजवटीमध्ये जनतेवर करण्यात आलेले भयावह अत्याचार, नरसंहार याबाबतही सांगण्यात आले आहे. एकेकाळी सुलतानाचे तख्त असलेल्या बिजापूरमध्ये एकेकाळी जगातील सगळ्यात मोठा घुमट उभारण्यात आला होता. प्राचीन शहरे, त्यांचे मुख्य दरवाजे हे एकेकाळी राजघराण्यांची शान होते. आज हे या शहरांतील रस्ते, दरवाजे ओस पडले असून जागतिक वारशाचा ते एक भाग झाले आहेत. हिरे बेन्नाकल आणि नर्थियांग यांचे गूढ उलगडण्याचाही या डॉक्युसिरीजमधून प्रयत्न करण्यात आला आहे. यांचा उगम आणि त्यांच्याशी निगडीत अनेक रहस्ये ही काळ्यात उदरात गडप झाली आहेत.
सात भागांचा हा माहितीपट दर्शकांसाठी अविस्मरणीय आणि अभूतपूर्व असा ठरेल याच शंकाच नाही. सत्यकथा, नाट्यरुपांतरण, कथेचे उत्तम सादरीकरण, मांडणी माहिती असलेल्या तथ्यांची तपासणी याद्वारे इतिहास पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अरुण थापर यांनी या डॉक्युसिरीजबाबत बोलताना म्हटले की, “‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ हा निवडक कथांद्वारे प्राचीन मध्ययुगीन भारत कसा होता हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्राचीन काळातील भारतामध्ये राहणारी लोकं ही गुणसंपन्न आणि खूप माहिती असलेली होती. विविध साम्राज्ये, राजघराणी भारताला घडवण्याच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्ती अशा सगळ्यांची माहिती आपल्याला या डॉक्युसिरीजद्वारे मिळण्यास मदत होईल.”
पाहा ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ विथ विल्यम डॅलरिंपल’ 4 जानेवारी 2024 पासून दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त हिस्ट्री टीव्ही18 वर