इफ्फी मधील, ‘मिड फेस्ट चित्रपट’ म्हणून ‘अबाऊट ड्राय ग्रासेस’ चित्रपटाचा रसिकांनी घेतला आस्वाद
November 27, 2023
0
इफ्फी मधील, ‘मिड फेस्ट चित्रपट’ म्हणून ‘अबाऊट ड्राय ग्रासेस’ चित्रपटाचा रसिकांनी घेतला आस्वाद
‘आबाऊट ड्राय ग्रासेस’ या तुर्कियेच्या नुरी बिलग सेयलान यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निवड 54 व्या इफफीमधील ‘मिड फेस्ट’ म्हणजेच महोत्सवाच्या मध्यांतरातील चित्रपट म्हणून निवड झाली होती. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मांडण्यात आलेली, मानवी जीवनातील गुंतागुंत, द्विधा मनःस्थिती आणि उदासिनता, अशा सगळ्या मिश्र भावनांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण करून, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
“मला मानवी नातेसंबंधांवर सिनेमा बनवायला आवडतो आणि तीच माझी चित्रपट निर्मितीची शैली आहे. मानवी भावभावना अनेकदा आपल्या कथाकथन प्रक्रियेत, अनपेक्षित आणि उत्स्फूर्त प्रसंग आणतात.” असे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते, नुरी बिलगे सेयलान यांनी सांगितले. पत्रसूचना कार्यालयाने, इफफी 54 मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
आपल्या शैलीविषयी अधिक विस्ताराने सांगतांना, ते म्हणाले, “मी माझ्या चित्रीकरणाच्या प्रक्रियेचे कधी नियोजन करत नाही. माझा भर, संवादांचे नियोजन करण्यावर आणि मग चित्रीकरण करतांना सेट वर सगळे काही नवे शोधण्यावर असतो. मी अनेकदा, दुसऱ्याच कुठल्या तरी उद्देशाने चित्रीकरण करून ठेवतो, मात्र वेळेवर ते भलत्याच ठिकाणी वापरतो. आणि अनेकदा मी खूप जास्तीचे शूटिंग करून ठेवले असते, त्यामुळे त्यातून मला एडिटिंग अधिक सर्जनशील होण्यासाठी भरपूर साहित्य मिळते.”
त्यांच्या चित्रीकरणासाठी, छायाचित्रकाराची निवड करण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना, त्यांनी सांगितले. “मी ज्यांच्यासोबत आधी काम केले असेल, त्यांचीच निवड करण्याकडे माझा कल असतो त्यांच्यासोबत काम करणे आनंददायी अनुभव असतो.”मात्र, त्यांच्या शेवटच्या चित्रपटात त्यांनी एक बदल केला, कारण त्यांना विनामूल्य सहकार्याची संधी मिळाली. “मला स्वतःला सिनेमॅटोग्राफी तंत्राची चांगली समज आहे, ज्यामुळे मला कोणत्याही छायाचित्रकाराशी जुळवून घेत प्रभावीपणे काम करता येते. मी छायाचित्रकाराचे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारे मूल्यांकन करतो, त्यांचा स्वभाव आणि कौशल्य या दोन्ही बाबतीत,” असे त्यांनी पुढे सांगितले.
आबाऊट ड्राय ग्रासेस.
फ्रान्स, तुर्कीये| 2023 | तुर्कीश | 208' | रंगीत
इ
सारांश : एका छोट्याशा गावात शिक्षक म्हणून अनिवार्य नियुक्ती झाल्यामुळे उदास झालेला एक तरुण शिक्षण, आशा लावून बसलेला असतो की, त्या गावातून त्याची लवकरच इस्तंबूल ला बदली होईल. मात्र, खूप काळ वाट बघूनही जेव्हा काहीच होत नाही, तेव्हा, या उदास आयुष्यातून बाहेर पडण्याच्या त्याच्या सगळ्या आशा मावळतात. मात्र अशावेळी त्याची सहकारी नूरे, त्याचा दृष्टिकोन बदलण्यात त्याला मदत करतो.
मूळ शीर्षक: ऑन ड्राईड हर्बस्
दिग्दर्शक आणि निर्माता: नुरी बिलगे सिलान
पटकथा: अकिन अक्सू, एब्रू सिलान, नुरी बिलगे सिलान
डीओपी: सेवाहीर साहिन, कुर्सत यूरेसिन
संपादक: ओगुझ अताबास, नुरी बिलगे सिलान
कलाकार: मर्वे दिझदार, डेनिज सेलिलोग्लू, मुसाब एकिकी
पुरस्कार: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कान 2023