निधी उभारणे –सर्जनशील कल्पनांना प्रत्यक्षात उतरवणे: गोव्यात 54 व्या इफ्फी दरम्यान, इन कॉनव्हरसेशन सत्र
November 27, 2023
0
महोत्सवाचे संचालक प्रीथुल कुमार, शरीक पटेल, फिरदौस हसन, सुनीथा टाटी यांनी सांगितल्या निर्मात्यांच्या निधी उभारणीसाठीच्या करामती
निधी उभारणे – सर्जनशील कल्पनांना प्रत्यक्षात उतरवणे” ह्या विषयावर आज 54 व्या इफफीत झालेल्या संवाद सत्रात, चित्रपट निर्मात्यांच्या भूमिकेच्या विविध पैलूंवर ज्यात - संकल्पनेपासून ते सिनेमाच्या अंतिम निर्मितीपर्यंत चर्चा झाली.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) चे महासंचालक आणि इफफी 54 चे महोत्सव संचालक, प्रिथुल कुमार यांनी चित्रपट निर्माते शारिक पटेल, फिरदौसुल हसन आणि सुनीता टाटी यांच्यासोबत चित्रपटांसाठी निधी उभारणीविषयी चर्चा केली.
एनएफडीसी द्वारे चित्रपट निर्मितीसाठी निवड करण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारले असता, प्रिथुल कुमार म्हणाले, “मूल्यांकनाची प्रक्रिया विस्तृत आणि स्पष्टपणे निश्चित केली आहे कारण हा करदात्यांचा पैसा आहे जो या चित्रपटांच्या निर्मितीसाठी वापरला जातो. गेल्या 10 वर्षांपासून, NFDC द्वारे निर्मित चित्रपटांची संख्या तशी कमी आहे कारण आता इतर स्त्रोतांकडून वित्तपुरवठा होत आहे आणि चित्रपट उद्योग वेगाने वाढत आहे म्हणून अशा निधीची आवश्यकता उरलेली नाही. भारत सरकारच्या चित्रपट निर्मितीसाठी निधीबद्दल बोलताना, त्यांनी नमूद केले की "सिनेमा आणि OTT मधून उत्तम आशयाची मागणी वाढत असताना, भारत सरकारनेही सकारात्मक पाऊल टाकत आर्थिक मदतीची रक्कम, 10 पटीने वाढवली आहे".
आजच्या पिढीच्या चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण पद्धती कशा शोधल्या पाहिजेत, याची माहिती, प्रिथुल कुमार यांनी दिली मग ते YouTube सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून किंवा ब्रँड्सशी संबंधित असले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी चित्रपट बाजार आणि फेस्टिव्हलसारख्या व्यासपीठांच्या महत्त्वावर भर दिला.
तरुण चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधताना, शारिक पटेल म्हणाले, "तोटा होण्याची शक्यता अधिक असलेला असा हा व्यवसाय आहे, जिथे यशाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, परंतु नफा मिळविण्यासाठी, एखाद्याने ते चिवटपणे चालू ठेवले पाहिजे आणि आपले कौशल्य वाढवत राहिले पाहिजे."
चित्रपट निर्मिती ही एक सतत सुरू असणारी, धावपळ आहे आणि पुढे चालण्यासाठी आपल्यात सिनेमाविषयीचे प्रेम आणि उत्कट जिद्द असणे आवश्यक आहे. पुढे सुनीता टाटी पुढे म्हणाल्या, "चांगले न चालणारे चित्रपट बनवणे, हा भविष्यात यशस्वी चित्रपट बनवण्यासाठी शिकण्याचा अनुभव आहे असे समजले पाहिजे.
चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याबद्दल बोलताना, फिरदौसुल हसन म्हणाले, “हा एक चित्रपटांविषयीचे प्रेम, पॅशन असणारा व्यवसाय आहे, त्यामुळे इथे पटकथा नाही, तर कोणत्याही पटकथेच्या मागे असलेली व्यक्ती महत्वाची असते. मी माझी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी चित्रपट बनवतो फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. आपल्याला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी पैशांची गरज असते पण आपले संपूर्ण प्राथमिक लक्ष एक चांगला चित्रपट बनवण्यावर असले पाहिजे. आणि त्यातूनच आपल्या प्रॉडक्शन हाऊसला ओळख मिळते, दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री यांची ओळख निर्माण होते.
सिनेमाचा व्यवसाय आणि एखाद्याची आवड यांच्यात समतोल राखणे का आवश्यक आहे यावरही सुनीता टाटी यांनी मार्गदर्शन केले., “आम्ही सिनेमाची आवड म्हणून या व्यवसायात आहोत पण सिनेमाचा व्यवसाय समजून घेण्यासाठीही आम्ही वेळ काढतो. या पूर्णपणे दोन भिन्न गोष्टी आहेत आणि या उद्योगात टिकून राहण्यासाठी, केवळ सिनेमाची आवड असणे पुरेसे नाही, तर सिनेमाचा व्यवसाय समजून घेणे आवश्यक आहे."
भरपूर उपस्थिती असलेल्या या सत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार कोमल नाथा यांनी केले.