जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' मधील 'घटस्थापना' या पवित्र विधीचे साक्षीदार व्हा फक्त शेमारू मराठीबाणा वर
October 21, 2023
0
*'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' मधील 'घटस्थापना' या पवित्र विधीचे साक्षीदार व्हा फक्त शेमारू मराठीबाणा वर*
शेमारू मराठीबाणाची मालिका, जोगेश्वरीचा पती भैरवनाथ मध्ये, 'ग्रामदेवता' म्हणून ओळखल्या जाणार्या गावाचा पालक देवतेबद्दल एक चित्तवेधक पौराणिक कथा आहे, जिने लॉन्च झाल्यापासून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. नवरात्रीच्या उत्सवादरम्यान, मालिकेमध्ये ‘घटस्थापना’ उत्सवाचे प्रदर्शन केले जाईल, त्यानंतर एक मनोरंजक कथानक ट्विस्ट असेल.
भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्यातील संघर्षांचे निरीक्षण करताना, महादेव आणि पार्वतीच्या लक्षात आले की भैरवनाथ आणि जोगेश्वरीचे लग्न वाचवण्यासाठी त्यांना गावचा प्रधान (नेता) आणि प्रधानचा जोडीदार या वेशात सोनेरीला भेट देण्याची गरज आहे. त्यासाठी महादेव भैरवनाथांना सल्ला देतात की, जो कोणी प्रथम येईल आणि राज्य चालवू इच्छित असेल त्याला प्रधानपद द्यावे.
नंतर, 'घटस्थापना' हा पवित्र विधी, महाराष्ट्रातील एक विशेष परंपरा आहे, पार्वती आणि जोगेश्वरी द्वारे सोनेरी किल्ल्यावर नवरात्र उत्सवाची सुरूवात म्हणून केली जाते. आगामी भागांमध्ये, देवी तुळजा भवानी आणि देवी म्हाळसा देखील मालिकेमध्ये दिसणार आहेत. देवी म्हाळसा जोगेश्वरीला तिच्या लग्नाबद्दल विचार करण्याचा सल्ला देईल कारण भैरवनाथ हा महादेवाचा औंश आहे आणि तो अत्यंत निष्पाप आणि भोळा आहे. जोगेश्वरीने तिच्या नशिबात पुढे काय आहे याबद्दल सावध राहावे असा इशाराही ती देते.
*सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध नवरात्रीच्या उत्सवासाठी तयार व्हा आणि जोगेश्वरी आणि भैरवनाथाच्या प्रवासाला लागणाऱ्या रोमांचक वळणांचे साक्षीदार व्हा. सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता बघायला विसरू नका 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' फक्त शेमारू मराठीबाणा वर.