*मराठी ताऱ्यांसोबत 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटी'चा दिलखुलास फिल्मी कट्टा!*
मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.” यांचे “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास बोलणारा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” अवघ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर करत आहे.
“फिल्मी कट्टा” या शोद्वारे प्रेक्षकांना चित्रपटाच्या पडद्यांमागच्या गमतीदार गोष्टींचा मनमोहक आणि उत्साही आनंद लुटता येणार आहे. “फिल्मी कट्टा” या शोमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित दिग्दर्शक, निर्माते, लेखक येऊन त्यांचे वैयक्तिक अनुभव, आव्हाने आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील यशाची गुपितं उघडी करणार आहेत. चर्चांमध्ये कथाकथन तंत्र, पटकथा लेखन, दिग्दर्शन, छायांकन, अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या एकूण प्रक्रियेसह विविध विषयांचा समावेश आहे. शोचा उद्देश केवळ मनोरंजनच नाही तर इच्छुक चित्रपट निर्मात्यांच्या सर्जनशील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अनमोल ज्ञान आणि प्रेरणा देणे हा आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे CEO श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी शोबद्दल व्यक्त होताना म्हणाले "अल्ट्रा समूहाद्वारे आम्ही नेहमीच मराठी सिनेमा आणि त्याच्या प्रतिभावान निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर असतो. ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’चा ‘फिल्मी कट्टा’ हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या आवडीस उतरेल यात शंका नाही तसेच सिनेसृष्टीत येऊ पाहणाऱ्या नव्या आणि होतकरू तरुणांना जेष्ठ अनुभवी दिग्गजांचा प्रेरणारूपी अनुभव मार्गदर्शक ठरेल, याची खात्री आहे.”
"फिल्मी कट्टा"
प्रेक्षकांना www.ultrajhakaas.com वेबसाइटद्वारे किंवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर अधिकृत ULTRA JHAKAAS मराठी ओटीटी अॅप डाउनलोड करून पहायला मिळेल.