*प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया लवकरच घेऊन येणार 'प्लॅनेट भारत'*
प्रेक्षकांना पाहायला मिळणार हायपरलोकल कॉन्टेन्ट
मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अशा प्लॅनेट मराठी ग्रुपने व्हिस्टास मीडियासोबत हातमिळवणी करून 'प्लॅनेट भारत' या नवीन ओटीटीची घोषणा केली आहे. या नवीन ओटीटीवर विविध ठिकाणच्या स्थानिक भाषेतील, शैलीतील सर्वोत्तम असा कॉन्टेन्ट प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या 'प्लॅनेट भारत'ची घोषणा करण्यात आली असून नोव्हेंबर २०२३ पासून त्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे.
भारतीय करमणुकीतील महत्वपूर्ण विकास म्हणून प्लॅनेट भारत विविध भाषांमधील हायपरलोकल कॉन्टेन्टची गरज पूर्ण करणार आहे. अर्थपूर्ण कॉन्टेन्टची निर्मिती, परवाना आणि वितरण करणे तसेच हा कॉन्टेन्ट सर्वोत्कृष्ट म्हणून नावारूपास आणणे, हा याचा मुख्य उद्देश असून मार्केटमधील सर्वात वेगळे ओटीटी अशी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. या इंडस्ट्रीतील पोकळी भरून काढण्याची गरज आहे. जिथे विशिष्ट प्रकारच्या कॉन्टेन्टकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यांना योग्य न्याय मिळाला नाही किंवा अकारण खर्च आहे. अशा कॉन्टेन्टना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न प्लॅनेट भारत करणार आहे. प्लॅनेट भारत आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन, दर्जेदार आणि मूल्यआधारित मनोरंजनाचा अनुभव देणार आहे. प्लॅनेट भारत हे नाव आपल्या राष्ट्राच्या स्थानिक आणि जागतिक स्वभावाचे प्रतीक आहे. त्यामुळे जागतिकीकरण झालेल्या या जगात खऱ्या अर्थाने भारतीय असण्याचा सन्मान या निमित्ताने अधोरेखित करण्यात येईल.
प्लॅनेट भारत फिचर फिल्म, वेबसीरिज, मालिका, संगीत, इन्फोटेनमेंट, नॉन फिक्शन, सोशल गेमिंग, वॉलेटसह एक सामाजिक मनोरंजन प्लॅटफॉर्मदेखील असेल.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्लॅनेट मराठीचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''भारतीय कॉन्टेन्ट तयार करणे आणि वापरणे यासाठी आपण मानके उंचावणे अत्यावश्यक आहे. आपला देश अनेक भाषांचे माहेरघर आहे, ज्या प्रत्येकाकडे आहेत. स्वतःची अनन्य शक्ती आणि क्षमता ज्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही. भारतातील काही भाषांमधील अपवादात्मक कॉन्टेन्टमध्ये लक्षणीय शून्यता आहे आणि प्लॅनेट भारत हे अंतर भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. प्लॅनेट भारत लाँच करून, आम्ही एक एकीकृत वन स्टॉप डेस्टिनेशन तयार करण्याचा प्रयत्न करतो, जिथे जगभरातील प्रेक्षक भारताने देऊ केलेल्या विविध सांस्कृतिक वारशाचा आनंद घेऊ शकतील आणि स्वीकारू शकतील."
प्लॅनेट मराठीने जगातील पहिला आणि एकमेव मराठी ओटीटी असल्याचा मान मिळवला आहे. त्यांनी 'रानबाजार', 'जून' आणि 'चंद्रमुखी' सारखे रेकॉर्डब्रेक चित्रपट, सीरिज दिले आहेत. प्लॅनेट मराठीने आपली एक ओळख निर्माण केलेली आहे. प्लॅनेट मराठी ओटीटीचे भागीदार, व्हिस्टास मीडियानेही 'भोंसले', 'जेएल-५०', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'नक्काश' हे हिंदी चित्रपट, 'जे बेबी' हा तामिळ, 'एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या विविध भाषेतील उच्च दर्जाचा कॉन्टेन्ट देण्यासोबतच हॉलिवूडमध्ये 'द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर', 'सन अँड द फेदरवेट (हॉलिवूडच्या ॲपियन वे फिल्म्ससह सह-निर्मिती) सारख्या चित्रपटांची निर्मिती, सह-निर्मिती केली आहे.
प्लॅनेट भारत प्रेक्षकांच्या भेटीला आणून, भारतातील प्रमुख भाषांमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचे या समूहाचे उद्दिष्ट आहे. खऱ्या अर्थाने भारतीय कॉन्टेन्टचा आवाका वाढवण्यासाठी अथक परिश्रम करून, प्लॅनेट मराठी कायमच प्रयत्नशील राहिले आहे.
व्हिस्टास मीडियाचे सीईओ अभयानंद सिंग म्हणतात, “आपला देश विविध भाषा, संस्कृती आणि बोलींनी बनलेला आहे आणि बर्याचदा अनेक कारणांमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्लॅनेट भारतचे उद्दिष्ट संपूर्ण राष्ट्राला एकत्र आणण्याचे आहे, ज्यामध्ये आपण आपल्या संस्कृतीतील विविधतेचे महत्त्वपूर्ण प्रतिनिधित्व अधोरेखित करू.”