Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उत्कंठा वाढवणारा "टेरिटरी' चित्रपटाचा टीजर लाँच

 उत्कंठा वाढवणारा "टेरिटरी' चित्रपटाचा टीजर लाँच


- संदीप कुलकर्णी आणि किशोर कदम यांची मध्यवर्ती भूमिका असलेला "टेरिटरी" चित्रपट १ सप्टेंबरला प्रदर्शित होणार


विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी उलगडणाऱ्या 'टेरिटरी' या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 



निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे 'टेरिटरी' हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन श्रीराम  यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये ही  मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर आता ते "टेरिटरी" या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आणि  पारितोषिकप्राप्त ठरला आहे. तसेच पुणे इंटरनशनल फिल्म फेस्टिवल, कान्स फेस्टिवल मार्केट,मेटा फिल्म फेस्टिवल,दुबई आणि मुंबई इंडि फिल्म फेस्टिवल     येथे ही  या चित्रपटाची निवड झाली होती. कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन, मयूर हरदास यांनी संकलन, महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरेखन, यश पगारे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.



यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो, या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आणि सुरू होतो एक थरारक शोध, या कथासूत्रावर 'टेरिटरी' हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाचा टीजर कथानकाप्रमाणेच दमदार आहे. विशेषतः छायांकन आणि पार्श्वसंगीतामुळे हा टीजर विलक्षण परिणामकारक झाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीचे कुतूहल आता अधिकच वाढले आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित "टेरिटरी" प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून खिळवून ठेवणार हे टीजरवरून दिसून येत आहे.


Teaser Link


https://youtu.be/4485lXdFcYE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.