शर्लिनचे नाव अनेक वादांशी देखील जोडले गेले असले तरी ती तिचं आयुष्य अगदी मस्त जगते.
मी राहुल गांधींशी लग्न करेन, पण...; शर्लिन चोप्राने ठेवली 'ही' एक अट
अभिनेत्री शर्लिन चोप्रा सतत विविध कारणांवरून सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या नवनवीन कारनाम्यांमुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेते. शर्लिनच्या कपड्यांपासून ते तिच्या कृत्यांपर्यंत सर्व काही इंटरनेटवर चर्चेचा विषय़ बनलं आहे. अभिनेत्रीचे व्हिडीओ आणि फोटो दररोज व्हायरल होत असतात. शर्लिनचे नाव अनेक वादांशी देखील जोडले गेले असले तरी ती तिचं आयुष्य अगदी मस्त जगते.
सध्या शर्लिन एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शर्लिनने लग्नासाठी होकार दिला आहे. शर्लिन कोणाशी लग्न करण्यासाठी हो म्हणतेय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शर्लिनला विचारण्यात आलं होतं की, तिला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का? ज्याला उत्तर देताना ती हो म्हणते. पुढे शर्लिननेही लग्नासाठी एक अट घातली. लग्नानंतरही तिचं आडनाव चोप्रा राहावं असं तिला वाटतं.
शर्लिनचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर युजर्स त्यावर भन्नाट कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, राखी सावंतसारखी हिनेही नशा केली आहे. एकाने लिहिलं, राहुल गांधींनी तिच्याशी लग्न करून आयुष्य वाया घालवू नये. दुसर्या युजरने तुझ्यासोबत कधीच करणार नाही असं म्हटलं. इतकंच नाही तर आणखी
एका युजरने लिहिलं की तू हे नक्की करशील पण ते करणार नाहीत.
अनेक युजर्स ने शर्लिन वर टीकेची झोड उठवली आहे .
स्वतःचे आरश्यात तोंड बघ , तू कुठे अन राहुल गांधी कुठे , गांधी घराणे एक प्रतिष्ठित आहे , राहुल घरंदाज मुलीशी लग्न करतील , त्यांना लग्नासाठी कचकडी ची बाहुली नको , अशा कित्येक कमेंट चा पाऊस नेटकरी यांनी पाडला.
शर्लिन चोप्रा तिच्या वक्तक्तव्यांमुळे ती चर्चेत राहते. जेव्हा तिने बिग बॉसच्या घरातून साजिद खानला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तेव्हा या अभिनेत्रीचे नाव चर्चेत आलं. पण तिला तसं करता आलं नाही. साजिदला बाहेर काढण्यासाठी अभिनेत्रीने पोलीस ठाण्यापर्यंत फेऱ्या मारल्या होत्या. साजिदविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.