*सोनी मराठीवर 'राणी मी होणार’ मालिकेतील कलाकारांनी केले पत्रकारांचे ग्रुमिंग*
आयुष्य बदलवणाऱ्या स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या 'ती'ची कहाणी आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ खिरीद आणि संचिता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राणी मी होणार’ या मालिकेचा प्रोमो झळकला असून हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि संचिता एका पार्लरमध्ये काम करताना दिसत आहेत. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेतील कलाकारांनी एक ॲक्टिंव्हिटी मीडियासोबत केली.
त्यांनी खऱ्याखुऱ्या पार्लरमध्ये जाऊन एक्सपर्ट्सच्या मदतीने पत्रकार मंडळींचे, कस्टमर्सचे ग्रुमिंग केले. नेलआर्ट, आय मेकअप, हेअर स्टाईल अशा सलोन सर्व्हिस त्यांनी दिल्या. या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, त्यांचे ब्युटी, मेकअप सिक्रेटस् शेअर केले. यानिमित्ताने कलाकारांनीही खऱ्या पार्लरमध्ये सर्व्हिस देण्याचा अनुभव घेतला.
'राणी मी होणार'चा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे. येत्या २१ ऑगस्टपासून सोनी मराठीवर रात्री आठ वाजता 'राणी मी होणार' ही नवी मालिका सुरु होत असून ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार पाहाता येणार आहे.