Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" बाईपण भारी देवा " चित्रपट प्रत्येक पुरुषाने आवर्जून पाहावा -- मा . राज ठाकरे

 *बाईपण भारी देवा हा चित्रपट फक्त बायकांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा! - श्री. राज ठाकरे*


बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही ह्या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलेले आपण पाहिले. तसच मुंबई पोलिसही चित्रपट पाहून भारावून गेले होते. 


आणि आज माननीय श्री. राज ठाकरे यांनीही चित्रपट पाहिल्यावर आपलं मत एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलं आहे.



मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे म्हणाले कि,स्त्रिया चित्रपट बघतच आहेत परंतु पुरुषांनीही पहावा असा हा सिनेमा आहे. आपल्या माता, भगिनी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जातात ते समजण्याची ही गरज आहे. चित्रपट पाहिल्यावर महिला स्वतःला रिलेट तर करतातच, परंतू पुरुषांनीही आपल्या रोजच्या जीवनात जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढून टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाईपणच्या कथानकाचं खरं यश हे आहे”


जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे आहेत. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाने, इतर अनेक चित्रपटांना मागे टाकत, आपला जोरदार ठसा उमटवला आहे हे नक्की !



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.