Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो मालिका रोमांचक वळणावर, पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य

 स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो मालिका रोमांचक वळणावर


पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य


स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय मालिका रोमांचक वळणावर आहे. गजराजने पिंकीचा खून केल्यानंतर पिंकीने जगाचा निरोप घेतला की काय असं वाटत असतानाचा आता मालिकेत पुन्हा एकदा पिंकीची नव्या रुपात एण्ट्री होणार आहे. गजराज विरुद्ध पिंकीच्या या लढ्यात पुन्हा एकहा विजय पिंकीचाच होणार आहे. पिंकीला हे नवं रुप दिलंय प्लास्टिक सर्जन देवयानी सदावर्ते यांनी. 



निसर्ग निर्मित प्रत्येक गोष्ट ही सुंदरच असते यावर देवयानी यांचा विश्वास आहे. अतिशय सकारात्मक आणि कोणत्याही वाईट गोष्टीत चांगलं शोधण्याची वृत्ती असणाऱ्या डॉ. देवयानी सदावर्ते पिंकीला तिच्या अपघातातून सावरतात आणि नवं जीवन आणि नवा चेहरा देतात. पिंकीच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात होतेय असंच म्हणायला हवं.



सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे- विज डॉ. शुभांगी सदावर्ते ही भूमिका साकारत असून जवळपास ६ वर्षांनंतर त्या मराठी मालिकेतून भेटीला येणार आहेत. या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या स्टार प्रवाह या नंबर वन वाहिनीसोबत काम करताना अतिशय आनंद होत आहे.



 कोठारे व्हिजन्सची ही मालिका आहे त्यामुळे महेश कोठारे यांनी या भूमिकेसाठी विचारणा केली तेव्हा हे पात्र मला खूपच आवडलं आणि मी तातडीने होकार दिला. पिंकीचा विजय असो या मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. डॉ. शुभांगी सदावर्ते पिंकीला नवा चेहरा देतात. मला खात्री आहे मालिकेतलं आणि पिंकीच्या आयुष्यातलं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तेव्हा पाहायला विसरु नका पिंकीचा विजय असो रात्री ११ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.