Dear Sir
*निखळ मनोरंजन करणारा "पिल्लू बॅचलर" दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला*
*मल्टीस्टारर "पिल्लू बॅचलर" च्या निमित्ताने दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार विनोदाची माळ*
*मल्टीस्टारर कलाकारांच्या अभिनयाने सजलेला "पिल्लू बॅचलर"*
*दिवाळीला येतोय "पिल्लू बॅचलर"*
विनोदी भूमिकांपासून गंभीर भूमिका सहजगत्या साकारणारा अभिनेता पार्थ भालेरावचा "पिल्लू बॅचलर" हा नवा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.
निर्माते सुनील राजाराम फडतरे, वर्षा मुकेश पाटील, अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी एम् घाडगे यांनी केलं आहे. पार्थ भालेरावसह सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, अक्षय टंकसाळे, शशांक शेंडे, मोहन आगाशे, सविता मालपेकर, भारत गणेशपुरे, स्वप्निल राजशेखर, योगेश शिरसाट, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण, रुचिता जाधव, कल्पना जगताप अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटातून भेटीला येणार आहे. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन तर अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
"पिल्लू बॅचलर" या नावावरून आणि पोस्टरवर दिसणाऱ्या पार्थ भालेरावच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून विनोदी अंगानं जाणारी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळेल असा एक अंदाज बांधता येतो. त्यामुळेच या पोस्टरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.