*‘जागरण’ चित्रपट महोत्सवात ‘रूप नगर के चीते’*
जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून मराठी चित्रपटांनी सातत्याने आपली मोहोर उमटवली आहे. दोन मित्रांमधील यारी दोस्तीची कथा सांगणाऱ्या एस एंटरटेन्मेंट बॅनरचा ‘रूप नगर के चीते’ हा मराठी चित्रपट प्रतिष्ठेच्या ‘जागरण’ चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. येत्या ११ ऑगस्टला कानपूर येथे रंगणाऱ्या या महोत्सावात जगभरातल्या ७० चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ज्यात ३६ भारतीय आणि ३४ विदेशी चित्रपटांचा समावेश आहे. जागरण सारख्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात आमचा चित्रपट दाखविला जाणार आहे ही आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी गोष्ट असल्याचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी आणि निर्माते मनन शाह सांगतात.
विशेष म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण २० चित्रपट महोत्सवांमध्ये ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाचे आजवर स्किनिंग झालं आहे. ‘अकादमी आणि बाफ्टा पुरस्कार पात्रता र्होड आयलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ही चित्रपटाची नुकतीच निवड झाली आहे.
लखनऊ, कानपुर, प्रयागराज, वाराणसी, गोरखपुर, बरेली, गुरुग्राम, दरभंगा, सिलिगुड़ी, देहरादून, हिसार, लुधियाना, पटना, रायपुर, रांची, इंदौर अशा वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होणारया या चित्रपट महोत्सवाची सांगता १५ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये ‘रूप नगर के चीते’ चित्रपट गौरविला जातोय, त्याचं कौतुक होतंय ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चित्रपटात करण परब आणि कुणाल शुक्ल, हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर आयुषी भावे, सना प्रभु, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजित कपूर या कलाकारांच्या भूमिका आहेत