Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" बाईपण भारी देवा " चित्रपट आता बघा केवळ 100 रू . मध्ये

 *बंपर ऑफर!!! फक्त १०० रुपयांत बाईपण भारी देवा! ... आतातरी सिनेमा बघायला जा म्हणत बायकांचं पुरूषांना एका धमाल व्हिडीओद्वारे आवाहन!*



बाईपण भारी देवा चित्रपटाच्या स्टारकास्ट चा एक धम्माल व्हिडिओ आऊट झाला आहे. त्यात दीपाने तिच्या दादाला, शिल्पाने काकांना, रोहिणी हट्टंगडीने मामाला, सुचित्राने तिच्या मेव्हण्यांना, सुकन्याने तिच्या ड्रायवरला तर वंदना गुप्तेनीं चक्क त्यांच्या फॅमिली डॉक्टरलाच धारेवर धरत फिल्म बघायला जायचं आवाहन केलं आहे.



येणारा सुट्ट्यांचा आठवडा बघता, जिओ स्टुडिओजने आजपासून चित्रपटाच्या तिकिटावर कमालीची सूट देत फक्तं १०० रुपयांत सिनेमा दाखविण्याची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्रातील प्रत्येक चित्रपटगृहात प्रेक्षकांना या नव्या अॅाफरचा आपल्या कुटुंबासोबत आनंद घेता येणार आहे.



आतापर्यंत बायकांनी थिएटर्स तुडुंब भरलेली होती परंतु गेल्या काही दिवसांत पुरुषांचा ही सिनेमाकडे झुकलेला कल पाहता, चित्रपटांतील अभिनेत्रींचा एक गमतीशीर व्हिडियो सोशल मीडियावर आऊट केला आहे तो बघता खरंच वाटतंय बाईपण भारी देवा!



जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि स्वतः जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळते 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.