Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ने सांगितला आपला मनोरंजन क्षेत्रातील संघर्ष

 *सुरुवातीला माझ्याकडे 'लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं', आज माझी स्वतःची कंपनी, टीम आहे आणि स्वतःचा स्टुडीओ सुध्दा बांधला आहे!*


*- अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर*



माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाइलवर मी यूट्यूबसाठी व्हीडीओ करायला सुरवात केली. लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट करायचे म्हणजे आवाज स्पष्ट येईल. आज माझ्या यूट्यूब सबस्क्राबरर्सचा टप्पा साडे नऊ लाखापर्यंत पोहचला आहे, माझी स्वतःची कंपनी आहे, टीम आहे आणि मी स्वतःचा स्टुडीओ सुध्दा बांधला - असं अभिनेत्री आणि यूट्यूबर उर्मिला निंबाळकर अभिमानाने सांगते. मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मिडीयावर तिने स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे. 




उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि टेलिव्हीजन माध्यमातून काम करत होती. तिने अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच प्रसिध्द हिंदी मालिकेतूनही काम केले. ज्यामध्ये दिया और बाती हम, दुहेरी, बन-मस्का याचा समावेश आहे. “खूप वर्षे मालिकेतून काम करत होते आणि माझ्याकडे खूप चांगल्या संधी सुध्दा होत्या. पण मालिकांमध्ये काम करताना दररोज 15-16 तास काम करावं लागतं ज्याचा शरीरावरती खूप परीणाम होतो, अजूनही सगळ्या मालिका सासू-सूनांमध्येच अडकल्यामुळे मला ते पटत नव्हतं. त्याचवेळी ओटीटी प्लॅटफॅार्म आणि यूट्यूबवर खूप चांगल्या प्रतिचा कन्टेट येत होता, अनेक जागतिक दर्जाचे यूट्यूबर्स उदयाला येत होते. त्यामुळे मला असं वाटलं की स्वतःचं असं काहीतरी निर्माण करायला पाहिजे. कलाकार हा नेहमी चांगले चॅनल, प्रोडक्शन हाउस, दिग्दर्शक यांच्यावरच अवलंबून असतो. पण यूट्यूब किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्वतःचा कन्टेट आणि प्रेक्षकवर्ग निर्माण करायची संधी मिळते आणि या विचारातूनच मी 2018 साली गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वतःचा यूट्यूब चॅनल चालू केला.” 




पहिली दोन वर्ष प्रतिसाद कमी होता तरीही उर्मिला वेगवेगळ्या विषयांचे व्हीडीओज बनवत राहीली, अनेक तांत्रिक बाबींचाही अभ्यास केला. फॅशन, मेक-अक, स्किनकेअर यांसारख्या विषयांवर मराठीमध्ये काहीच कन्टेट नव्हता. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला आणि बघता बघता हजारो आणि मग लाखो प्रेक्षक झाले. तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मेकअप आणि स्किनकेअर ब्रॅंडने तिच्यासोबत काम केले. इतकेच नाही तर स्टोरीटेल या ओडीओबुक अॅपवर उर्मिलाने स्वतःच्या पॅाडकास्ट शोची निर्मिती केली तसेच अनेक ओडीओ पुस्तकांना आवाजही दिला. तिच्या पेटलेला मोरपीस या ओडीओ कादंबरीसाठी तिला मानांकीत बेस्ट व्हाइस ओफ इंडीया पुरस्कारानेही गौरवण्यात आले. 



“याचे सारे श्रेय आपल्या मराठी प्रेक्षकांचे आहे. मराठीत उत्तम प्रतिचा कन्टेट दिला तर प्रेक्षक तो उचलून धरतात. फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच गोष्टी चालतात हा गैरसमज आहे. मराठी यूट्यूबर्सना भरपूर संधी आहे, या क्षेत्रात भरपूर पैसा आहे. गुगल सुध्दा स्थानिक भाषांना प्रोत्साहन देत आहे आणि लोकांना आपल्या स्वतःच्या भाषेतच कन्टेट बघायला आवडतो. तो कोणीच बनवत नाही त्यामुळे बघितला जात नाही. ही सुध्दा सुरवात आहे अजून बरेच पुढे जायचे आहे”, असं उर्मिला सांगते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.