Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अमेझॉन मिनी टीवी सादर करत आहे '‘हाफ सी ए’'! सीएची स्वप्ने पाहणाऱ्या नव्या युगातील तरुणांची नवी कहाणी!!

 दरवर्षी 1 जुलैला 'सी ए' दिवस (chartered accountant Day) साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अमेझॉनच्या निशुल्क व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिस म्हणजेच अमेझॉन मिनी टीव्हीने एक विशेष सीरीज दर्शकांपुढे आणायचं ठरवलं आहे.  ‘हाफ सी ए’ असं या सीरीजचं नाव असून यामध्ये अहसास चन्ना, प्रीत कमानी, ज्ञानेंद्र त्रिपाठी, अनमोल कजानी आणि रोहन जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. टीव्हीएफ अर्थात द व्हायरल फिव्हरने या सीरीजची निर्मिती केली असून यामध्ये सीए बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कायकाय घडतं हे दाखवण्यात आलं आहे. आर्ची आणि तिच्या मित्रांच्या आयुष्यात सी ए बनण्याची तयारी करण्यापासून अंतिम परीक्षेपर्यंत कायकाय घडत जातं हे या सीरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. सी ए हा जगातील सगळ्या अवघड पेशांपैकी एक पेशा मानला जातो. सी ए बनणं ही सोपी गोष्ट नसून, विद्यार्थी त्यासाठी काय काय करतात हे या सीरीजमध्ये पाहायला मिळेल.



“"यशप्राप्तीची कहाण्या आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या असतात.  ‘हाफ सी ए’ मध्ये विद्यार्थी करत असलेले प्रयत्न, त्यांचे धाडस, करो या मरोचा सतत चालणारा संघर्ष हे मार्मिक पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. द व्हायरल फीव्हरची निर्मिती असलेली ही सीरीज फक्त सीएच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर सर्वसामान्य प्रेक्षकांनाही आवडेल. जिद्द, चिकाटी आणि आशा हे गुण अधोरेखित करणारी ह सीरीज प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे. " असे अमोघ  दुसाद, हेड ऑफ कंटेट, अमेझॉन मिनी टीव्ही यांनी म्हटले.


'‘हाफ सी ए’' बाबत बोलताना अभिनेत्री अहसास चन्ना हिने म्हटले की "आजपर्यंत शैक्षणिक विश्वातील ज्या गोष्टी कधी सादर करण्यात आल्या नव्हत्या त्या '‘हाफ सी ए’ 'द्वारे सादर करण्यात आल्या आहेत आणि यामुळेच मला या सीरीजमध्ये काम करताना खूप मजा आली. या मालिकेतील माझं पात्र हे एका विद्यार्थिनीचं असून ही विद्यार्थिनी स्पर्धात्मक जगामध्ये वर येण्यासाठी धडपड करत असते.  'सी ए' साठी तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना या सीरीजबाबत आपलेपणासा वाटेल कारण तेही कधी ना कधी या सीरीजमध्ये दाखवलेल्या परिस्थितीतून गेलेले असतात किंवा जात असतात. ही सीरीज पाहात असताना आपल्या सगळ्यांना विद्यार्थी दशेतील दिवस पुन्हा आठवतील याची मला खात्री आहे."


‘हाफ सी ए’' लवकरच Amazon Shopping अॅपमधील Amazon miniTV वर आणि Fire TV वर निशुल्क प्रदर्शित होणार आहे.


Announcement Link: https://youtu.be/znoHWOffnOI

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.