हिप हॉप इंडिया' हा नवीन शो Amazon ची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असलेल्या Amazon miniTV येणार असून भारतातील मोठ्या हिप-हॉप नृत्य कलेच्या टॅलेंटच्या शोधात आहे. शोच्या लोगोचे अनावरण केल्यावर, अॅमेझॉन सेवेने रिअॅलिटी शोच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आपल्या पहिल्याच रिअॅलिटी शोसाठी त्यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट नर्तक आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना करारबद्ध केले आहे. हिप हॉप इंडियासोबतच्या त्यांच्या कराराची घोषणा करताना, रेमो डिसूझा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हँडलवर अधिकृत पोस्टर शेअर करून नृत्य क्षेत्रात एकच खळबळ उडवली आहे. भारताच्या कानाकोऱ्यातील गल्लीबोळातील नवोदित हिप-हॉप नर्तकांना सर्वात मोठे, धाडसी आणि अत्यंत तगडे लाँचपॅड प्रदान करत त्यांना गौरव मिळवून देणे हा उद्देश आहे.
'हिप हॉप इंडिया' हा एक रोमांचक नवीन फॉर्मेट असलेला एक नृत्य कार्यक्रम असणार आहे. जो प्रेक्षकांचे मनोरंजन तर निश्चित करेल आणि त्यांना आणखी नवीन काही पाहण्याची उत्सुकता वाढवणारा असेल. सर्वोत्कृष्ट हिपहॉप डान्सर बनण्याचे स्वप्न पाहणारे सगळे नर्तक या स्पर्धेमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावताना पाहायला मिळतील. शोमध्ये दर आठवड्याला एक नवीन सेलिब्रिटी डान्स जज असेल जो रेमोसोबत डान्सची धम्माल आणखी वाढवेल. या व्यतिरिक्त, लवकरच उघड होणारे गुप्त जज हे ठरवतील की भारताचा सगळ्यात मोठा 'हिप हॉप सेन्सेशन' मुकुट कोणाला मिळेल.
यावर बोलताना रेमो डिसूझा याने म्हटले, "मला वाटते की नृत्यकला ही शब्द आणि भावनांच्या पलीकडे नेणारी असते. मी आज जे काही आहे तो केवळ नृत्यामुळे आहे. हिपहॉप शैलीचा नृत्यप्रकार हा मला जीवन अधिक उत्फुल्लपणे जगायला शिकवत असतो. आतापर्यंतचा हा प्रवास फार सुंदर होता. हिप हॉप इंडियाच्या निमित्ताने मी Amazon miniTV च्या सोबतीने एक पाउल पुढे टाकले आहे. Amazon mini TV सोबत माझे हे पहिलेच कोलॅब्रेशन आहे. हिप हॉप नृत्य करणार्या स्पर्धकांचे थक्क करणारे डान्स पाहण्याची या निमित्ताने मला संधी मिळाली आहे याचा मला आनंद आहे.. कम ऑन इंडिया लेट्स हिप हॉप
हिप-हॉपर्ससाठी त्यांची कला सादर करण्याची, सर्वात कठीण टप्पा पार करण्याची आणि हिप-हॉप इंडियामध्ये सर्वोच्च स्थान पटकावण्याची वेळ आली आहे. हा शो लवकरच अॅमेझॉनच्या शॉपिंग अॅप आणि फायर टीव्हीमध्ये केवळ Amazon miniTV वर स्ट्रीम होईल.