पद्मश्री कैलास खेर यांच्या कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव चे निमित्ताने पार पडला भव्य दिव्य संगीत समारोह
संगीत आणि गायन क्षेत्रातील नवीन प्रतिभावान व्यक्तींना संधी मिळावी यासाठी पद्मश्री कैलास खेर आणि कैलासा एंटरेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने " नयी उडान " हा कार्यक्रम नुकताच बांद्रा येथील सेंट अँड्र्यू हॉल मध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात हरिप्रसाद चौरासिया , सुरेश वाडकर , शान मुखर्जी , अमृता फडणवीस , प्रशांत वीरेंद्र शर्मा , डी जे शेजवूड , अंकिता मेथी , विशाल कोठारी जैन , विनोद धारण , अझीझ झी , सनोब हेरेकर , किमज सोमजी , इशिता अरुण , हृदय गट्टनी , मेघा डाकलिया , सुनील पाल समेत मनोरंजन , सामाजिक , औद्योगिक क्षेत्र से कई मान्यवर उपस्थित थे .
या प्रसंगी कैलास खेर यांनी मनोगतात सांगितले की , आज मी केवळ गीत - संगीता मुळेच या टप्प्यावर पोहोचलो . संगीताने मला मानसिक शांती , आधार , स्थैर्य दिले . मी जेव्हा या क्षेत्रात सुरुवात केली तेव्हा आम्ही अनंत अडचणींचा सामना केला होता . माझ्या समकालीन सहकाऱ्यांना असेच अनुभव पाठीशी आहेत . काळं बदलला असून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावंत यांना मदत व्हावी , त्यांना संधी मिळावी यासाठी मी आणि आमच्या संस्थे मार्फत प्रयत्न करीत आहोत .
कैलास खेर अकेडमी फॉर लर्निग आर्ट , केके एल ए धाम , कैलास खेर फाऊंडेशन , कैलास सिध्दी आदी चे रूपाने मनोरंजन क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी पणे कार्य करीत आलो आहोत .
करोना चे वैश्विक महामारी संकट नंतर आमच्या संस्थांनी पुन्हा नव्या उमेदीने कार्यास प्रारंभ केला आहे . मनोरंजन क्षेत्रात एक नवीन पायंडा पाडून संगीत क्षेत्रात अवघ्या विश्वात भारतीय संगीत अजरामर व्हावे , इतरांनी आपले अनुकरण करावे अडी प्रामाणिक इच्छा असल्याचे खेर यांनी सांगितले .