देशप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा 'बटालियन ६०' हा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'किंग प्रोडक्शन' आणि तुषार कापरे पाटील निर्मित आणि प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित 'बटालियन ६०' मधून उलगडणार एका शूर वीराची गाथा
बटालियन ६० चित्रपटातून समोर येणार प्रीतम एस के पाटील यांच्या दिग्दर्शनाचं आगळंवेगळं रूप
बलोच' चित्रपटानंतर अभिनेता गणेश शिंदेच्या 'बटालियन ६०' या नव्या चित्रपटातील भूमिकेची होतेय सर्वत्र चर्चा*
आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास लाभला आहे. आपल्या मातीतल्या वीर पुत्रांनी या इतिहासाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे, याचे अनेक धडे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. हे वीर महाराष्ट्राच्या मातीतून कसे घडतात, त्यांचा तो प्रवास जाणून घेण्यासाठी लवकर रुपेरी पडदा गाजवायला एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'किंग प्रोडक्शन' आणि आणि तुषार कापरे पाटील प्रस्तुत हा चित्रपट असून दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित 'बटालियन ६०' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.
मराठमोळ्या मातीत तयार झालेल्या एका शूर वीर नायकाची कथा या चित्रपट मांडण्यात येणार आहे. शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडत जातात याचं हुबेहूब वर्णन या चित्रपटात करण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाच पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरा वीर पाहायला मिळतोय, तसेच बॉर्डरवर हातात बंदूक घेऊन सैनिक दिसत आहेत, यावरून चित्रपटात एका शूर सैनिकांची गाथा पाहायला मिळणार असल्याचं कळतंय, पाठमोरी असलेली व्यक्ती म्हणजे 'बलोच' फेम अभिनेता गणेश शिंदे आहे. अद्याप चित्रपटातील इतर कलाकार गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून लवकरच चित्रपटातील इतर कलाकारांची नाव समोर येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी सांभाळली आहे. तर 'किंग प्रोडक्शन' आणि तुषार कापरे पाटील यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे.
'बटालियन ६०' हा चित्रपट एका शूर सैनिकाची कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. देशप्रेमींसाठी हा चित्रपट एक पर्वणीच असेल यांत शंकाच नाही.