गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी अंताक्षरी, सा रे ग म प, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे काही वास्तववादी कार्यक्रम सादर केले. अंगच्या कलागुणांवर आधारित असलेले हे रिअॅलिटी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर झालेच, पण ते आजही तितकेच लोकप्रिय असून आजच्या काळातही त्यांना स्वत:चा प्रेक्षकवर्ग आहे. गतवर्षीच्या सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ हा आयकॉनिक कार्यक्रम देशातील होतकरू गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची संधी देण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे.
‘सा रे ग म प 2023’साठी शनिवार, 29 जुलै आणि रविवार, 30 जुलै रोजी मुंबई शहरात प्रत्यक्ष ऑडिशन्सना प्रारंभ होणार आहे. तेव्हा जर तुम्ही 15 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल, तर तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाइन ऑडिशन्स यापूर्वीच सुरू झाल्या असून त्यासाठी तुम्हाला केवळ झी5 हे अॅप मोबाईलमध्ये उतरवून घ्यावे लागेल. त्यावरील योग्य त्या गटात प्रवेश करून तुम्ही आपली प्रवेशिका पाठवू शकता.
या होतकरू गायकांसाठी आणखी एक उत्साहजनक बातमी म्हणजे, गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांच्या इतिहासात प्रथमच ‘झी टीव्ही’ वाहिनीने या आवृत्तीसाठी प्रेक्षकांना इच्छुक स्पर्धकांची निवड करण्यासाठी निमंत्रित केले आहे. आखिर टॅलेंट को पेहचानना भी एक टॅलेंट है! प्रेक्षकांना एखाद्या गुणी गायकाचा शोध घेण्याची संधी देऊन या वाहिनीने देशातील अशा होतकरू गायकांचा शोध घेण्याचा आणि सा रे ग म प कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी करून घेण्याची शिफारस करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच कार्यक्रमाच्या या आवृत्तीत अपवादात्मक स्पर्धकांसाठी सिंगर ऑफ द वीक म्हणून निवड झालेल्या गायकाला त्याचे गाणे झी म्युझिक कंपनीद्वारे प्रसृत करण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर वाहिनी एका महत्त्वपूर्ण उपक्रमास प्रारंभ करीत असून त्यानुसार या कार्यक्रमात प्रथमच कागदाचा वापर कुठेही होणार नाही. यंदाच्या ऑडिशन्समध्ये आणि नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमातही कागदाचा वापर अजिबात केला जाणार नाही. हे एक पर्यावरणप्रेमी, जबाबदार, प्रथमच योजलेलेवैशिष्ट्यपूर्ण पाऊल असून रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रमाच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.
येत्या काही आठवड्यांमध्ये गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, लखनौ, चंदिगड, जयपूर, दिल्ली आणि वडोदरा या शहरांमध्ये ऑडिशन्सना प्रारंभ होणार असून झी टीव्ही मुंबई शहरातही प्रत्यक्ष स्थळांवर ऑडिशन्स घेणार आहे. तेव्हा तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा आवाज सुरेल आहे आणि तो जगापुढे सादर केला पाहिजे, तर तुम्हाला नजीकच्या शहरात जाऊन ऑडिशन्समध्ये सहभागी व्हावे लागेल.
ऑडिशन तारीख - 29-30 जुलै 2023
वेळ - सकाळी 8 वाजल्यापासून
स्थळ : नहार इंटरनॅशनल स्कूल, नहारचा अमृत शक्ती रोड, डीपी रोड नं. 2, चांदिवली, पवई, मुंबई- 400072